पूर्णेतील भाजप नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांना मातृशोक
पूर्णा(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पूर्णा येथिल भाजपचे नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मातोश्री शकुंतलाबाई भिमराव कदम रा.पूर्णा यांचं ता.२९ जानेवारी रोजी सायं वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंतीम यात्रा ही गुरुवारी ३० जानेवारी रोजी सकाळी त्यांचे महाराणा प्रतापसिंह चौक येथील निवासस्थानाहुन निघणार असून येथिल हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात विद्याप्रसारणी शाळेचे संचालक भिमरावजी कदम ,भाजपनेते बाळासाहेब कदम, रमाकांत कदम, श्रीकांत कदम,मुलीं सुना, नातवंडे , जावई असा मोठा परिवार आहे.