पूर्णेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण..
पूर्णेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण..
पूर्णा/ प्रतिनिधी
पूर्णा शहरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रतिक्षा लागलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे व पालीकेच्या सदस्यांच्याउपस्थितीत करण्यात आले.
पूर्णा शहरात मागील काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमी जनतेतून होत होती.न.पा.निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे यांनी शहरात महापुरुषांचे पुतळे बसवण्याचे अभिवचन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते.मागील दोन वर्षांपासून खा.संजय जाधव यांच्या पुढाकाराने पुतळे उभारणी साठी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे कार्य हाती घेतले आहे.प्रत्यक्ष आज शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे, नगराध्यक्षा प्रतिनिधी संतोष एकलारे, शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम ता.प्र.काशिनाथ काळबांडे, गटनेते उत्तमभैय्या खंदारे व हाजी कुरेशी, नगरसेवक श्याम कदम, अँड राजेश भालेराव, नितीन कदम,सुधाकर खराटे, साहेब कदम,चांदसाब बागवान,विरेश कसबे अँड हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड,जाकीर कुरेशी, बालाजी कदम, तानाजी गाढवे, दादाराव पंडीत, मेहबूब कुरेशी, अँड धम्मदीप जोंधळे,अजमद नुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड,पो.नि.भागोजी चोरमले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तप्पुर्वी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झिरो फाटा ते पुर्णा मार्गे शहरात आणलेल्या अश्वारूढ पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक शहरातुन काढण्यात आली यावेळी शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.












