बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्त
बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्त
अंधाराचा फायदा घेत आरोपी पोबारा पूर्णा पोलिसांची धड़ाकेबाज कार्यवाही
पुर्णा/प्रतिनिधी
पूर्णा शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने शहरात मध्यरात्री छापेमारी करत एका बोलेनो कारमधून तस्करी होत असलेला ११ हजार ८०० रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा ४ लाख रुपये किंमतीची कार असा ४ लाख १८ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जप्त करत पूर्णा पोलीसांत दोन अज्ञात ईसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी मध्यरात्री पो.निरीक्षक विलास गोबाडे यांना पूर्णेत एक बलेनो कार गुटखा तस्करीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यामाहिती आधारे त्यांनी आपल्या सह फौजदार केंद्रे पो.काॅ.नळगीरकर पो.काॅ. शेंबेवाड यांना सोबत घेऊन शहरात सापळा लावला.मध्यरात्री दिड ते दोनच्या सुमारास गवळी गल्ली परिसरात त्यांना एका बलेनो गाडीतून गुटखा तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. पो.नी गोबाडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा घातला.यावेळी अंधाराचा फायदा घेत गुटख्याचे पोते गाडीतून उतरवणा-या दोघांनी पोलिसांना पाहून पोबारा केला.पोलिस पथकाने घटना स्थळावरून(एम.एच.१७/बी.व्ही/४३७३) ग्रे रंगाची बलेनो कार व त्यात पोत्यामध्ये ११ हजार ८०० रुपये किंमतीचा विमल गुटखा, ४ लाख रुपये किंमतीचे जुने चारचाकी वाहन तसेच असा ४ लाख ११ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पूर्णा पोलीस ठाण्यात पो.काॅ. मनोज नळगीरकर यांच्या फिर्यादी वरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार चंद्रकांत केंद्रे हे करत आहेत