पूर्णा तालुक्यातही भिशी चालकाने घातला नागरिकांना १ कोटींचा गंडा

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
परभणी शहरातील भिशी चालकाने जवळपास ३० कोटी रुपये गोळा करून अनेकांना गंडा घालत पोबारा केल्याची घटना ताजी असतानाच आता पूर्णा तालुक्यातील देगाव (तेल्याचे) येथील काही नागरिकांना विश्वासात घेऊन भिशी चालवण्याच्या नावाखाली १ कोटींच्या जवळपास रोख जमा करून पोबारा केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,देगाव येथे एका कपडा विकण्याचे दुकान चालवणाऱ्या ने गावातील शेतकरी मोलमजुरी करणारे यांचा विश्वास संपादन करुन. ओळखीची सलगी करत भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरु करुन त्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करुन
करुन भिशीचा व्यवसाय चालू केला. ५ हजारापासून ५० हजार रुपायापर्यंतचा भिशीचा हप्ता रोख तर कोणाकडून फोनपेवर हप्ता रक्कम वर्ग करुन घेत असे.
सुरुवातीला काही महिने हा व्यवसाय तो विश्वासाने चालवत होता. परंतू, मागील काही महिन्यात त्याने १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करुन घेतली आणि परतावा दिलाच नाही. यानंतर गुंतवणूक करणा-या पुरुष व महिलांनी त्या युवकाच्या पूर्णा येथील घरी चकरा मारुन दिलेले पैसे वापस देण्याची मागणी केली. असता त्याने राहते घर किंवा अन्य मालमत्ता विकून देतो असे सांगून सबंधीत गुंतवणूकदारांची बनवाबनवी करुन वेळ निभावून नेली. पण आता संबंधित यूवक रक्कम घेऊन घर सोडून फरार झाला असल्याची माहिती देगाव येथील सबंधित गुंतवणूकदार शेतकरी गंगाधर ईंगोले, बाबूराव पटवे, श्याम वळसे यांनी बोलताना सांगितले असून या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे बोलून दाखवले. दरम्यान, या फसवणूक प्रकारामुळे देगावात एकच खळबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page