कौतुकास्पद;स्वा.रा.ती.म. विद्यापीठाची डॉ.शिवसांब कापसे यांच्या लघुशोध प्रकल्पास मंजूरी
पूर्णा(प्रतिनिधी)
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा ने डॉ शिवसांब कापसे यांना महात्मा बसवेश्वर यांच्या वचनातील अंधश्रद्धा निर्मूलनविषयक चिंतन या विषयावर लघुशोध प्रकल्प मंजूर केला आहे,महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात आपल्या लेखन आणि कर्तृत्वातून समाज परिवर्तन घडवून आणले, त्यांच्या विचारांचा प्रभाव वर्तमान काळावर तितकाच आहे, त्याच्या वचनावर सातत्याने संशोधन होत असून त्याचाच एक भाग म्हणून हा शोध प्रकल्प विद्यापीठाने संशोधन कार्यासाठी मान्य केला आहे.या बद्दल श्री गुरू बुद्धिस्वामी शि. प्र.संस्थचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम,सहसचिव गोविंद कदम ,प्राचार्य डॉ के राजकुमार,उपप्राचार्य गजानन कुरुंदकर यासह सर्व सहकार्य यांनी अभिनंदन केले आहे