आ.डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाच्या गौर सर्कल प्रमुखपदी साहेबराव भाकरे यांची निवड
पूर्णा(प्रतिनिधी)
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ रतनाकर गूट्टे यांनी पूर्णा तालुक्यातील डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाची नुतन कार्यकारणीची निवड जाहीर केली असुन, तालुक्यातील गौर सर्कल प्रमुख पदी खुजडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वि.वि.का.से.सो चेअरमन साहेबराव भाकरे यांची वर्णी लागली आहे.
पूर्णा तालुक्यातील आ. डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या तालुक्यातील कार्यकारिणीत खुजडा येथील सेवाभावी सोसायटी चेअरमन साहेबराव भाकरे यांना गौर सर्कल प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतेच त्यांना आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी निवडीचे पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सूभाषराव देसाई बंटी भाऊ कदम, चांदोजी मामा बोबडे, नंदकुमार डाखोरे, गिताराम देसाई, उत्तमराव ढोणे,बालाजी रूदरवार
दिलीपराव अंभोरे,मारोती आणा मोहीते,निवृती दधाटे उद्धवराव शिंदे, नाना आवरगंड, गंगाधर बोकारे, मारोतराव बखाल आदींसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.