पूर्णा शिवारात शार्टसर्कीट साडेतीन एक्कर ऊस जळाला

Spread the love

दोन शेतकऱ्यांचे सुमारे ६ लाखांचे नुकसान;पोलीसांत घटनेची नोंद


पूर्णा(प्रतिनिधी)
शहरापासून जवळच असलेल्या कौडगांव रस्त्यावरील पूर्णा शिवारातून जाणाऱ्या ११ केवी विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीमुळे खाली असलेल्या उभ्या उसाने पेट घेतल्याची घटना सोमवार ता. १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली असून घटनेमध्ये शेजारी शेजारी असलेल्या दोन शेतकऱ्यांचा उभा ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पूर्णा- कौडगांव नामदेव दत्तराव मुळे रा. अंबा नगरी मुळे वाडा पूर्णा यांची साडेपाच एकर शेत जमीन आहे त्यापैकी अडीच एकरावर उसाचे पीक घेतले आहे. तर त्यांच्या शेजारी असलेल्या शिवाजी बाबाराव रोडगे राहणार नवव्या पूर्ण यांचे देखील तीन एकर शेत आहे. त्यांनीही आपल्या सव्वा एकरावर उसाची लागवड केली होती. दरम्यान सोमवार ता.१७रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या अकरा केवी विद्युत वाहिनीच्या तारामध्ये घर्षण होऊन आगीच्या विस्तव उसामध्ये पडला यामुळे वाहिन्याखाली उसाने पेठ घेतला. ऊस पेटला असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले तोपर्यंत अर्ध्या अधिक शेतातील उसाला आगीने आपल्या भक्षस्थानी घेतले होते. परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच शेतमालकांनी आग विकत जाऊन याचा आटोकाठ प्रयत्न केला परंतु आम्ही पुढे कोणाचेच काहीच नाही शेवटी दोन्ही शेतकऱ्यांची मिळून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी पूर्णा पोलीस स्थानकांना कळविले असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

महावितरण विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने उपयोजना करावे
मागील काही दिवसांत विद्युत वाहिनेच्या तारामध्ये घर्षण होऊन वाहिन्याखालील उभी पिकं जळत असल्याचे प्रकार वाढत आहेत तालुक्यांमध्ये यापूर्वीही याच प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे ऊस सोयाबीन ज्वारी आदी पिके जळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद आहे. अशा घटना तालुक्यात वारंवार घडत असताना संबंधित महावितरण विभागाकडे अनेक शेतकरी तक्रार करूनही लूम कळत असलेल्या तारा जुनाट झालेल्या तारा प्रशासन बदलून देत नसल्याने याचा नाक फटका शेतकऱ्यांना सोसावं लागत आहे. इतरांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून तालुक्यात तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page