महाराष्ट्रातील उपासकांसाठी बुद्धगया येथे यात्री निवास उभारा-डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो

Spread the love

सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांची भेट घेऊन केली मागणी

पूर्णा(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्यातून बुद्धगया येथे जाणाऱ्या बौद्ध उपासकांच्या सुविधेसाठी हक्काचे यात्री निवास उभारावे तसेच पूर्णा येथील बौद्ध विहारात संदर्भातील कामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अ.भा. भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे रविवार,ता.२३ रोजी, डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो, यांनी सा.बां.विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस.भगत व इंजि.बी. के.आदमने यांच्या समवेत सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.भेटी दरम्यान बिहार राज्यातील बुद्धगया येथे महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या बौद्ध उपासक यात्रेकरुंची संख्या लक्षणीय आहे.तेथे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हक्काचे महाराष्ट्र यात्री सदन उभारण्यात यावे. तसेच पूर्णा बुद्ध विहार येथे विपश्यना केंद्र व बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी निधी मिळवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page