कंठेश्वर-सातेगांव शिवरस्ता मोकळा करा; शेतकऱ्यांची मागणी

Spread the love

पूर्णा तहसीलदारांना निवेदन

पूर्णा(प्रतिनिधी)

तालुक्यातील कंठेश्वर शिवारातील कंठेश्वर- सातेगांव शिवरस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. प्रशासनाने सदरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने काढून शिवरस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी कंठेश्वर येथिल शेतकऱ्यांनी पूर्णा तहसीलदारांकडे शुक्रवारी ता.२८ रोजी दिलेल्या एका निवेदनात केली आहे.

   पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर शिवारातुन सातेगांव कडे जाणारा शिवरस्ता हा गट नंबर १८६ व सातेगांव गट,(३), व (६१)में गटानं (१२),(११) मधुन जातो या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक शिवरस्ता असल्याचे माहीत असतानाही अतिक्रमण केले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रहदारी करीता मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी लक्ष वेधून रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमण तातडीने काढुन रस्ता मोकळा करून द्यावा अशा मागणीचे निवेदन कंठेश्वर येथिल शेतकऱ्यांनी तहसीलदार पूर्णा यांना दिले आहे.निवेदनावर मारुती सिताराम कदम,संजय गंगाधर कदम, उद्धव बालासाहेब कदम, अर्जुन संतोबा कदम, सिताराम किसनराव कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page