शिंदे गटाचे नेते विशाल कदम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
पूर्णा(प्रतिनिधी)
शिवसेना (शिंदे गट )नेते विशाल भाऊ कदम यांच्या हस्ते रविवारी २ रोजी सकाळी शहरातील महादेव मंदिर परिसर, कोळी गल्ली, पाहुणा मारोती मंदिर परिसर, भवानी मंदिर भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पूर्णा शहरातील महादेव मंदिर परिसर, कोळी गल्ली, पाहुणा मारोती मंदिर परिसर, भवानी मंदिर भागात मागील काही वर्षांपासून रस्ता नाली आदीं विविध समस्या निर्माण झाल्या होत्या.नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेश कदम,अंकित कदम, विशाल किरडे,राजु कदम आदींनी येथिल विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली सदरील पदाधिकारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सदरील बाबतीत पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याविकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे.त्यामुळे पदाधिकारी यांनी देखील उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांचेआभार मानले आहेत.कित्येक वर्षांपासून विकास कामापासून वंचित असलेल्या परिसरात आता प्रत्यक्ष विकास कामांना सुरुवात झाली असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.विशाल कदम यांच्या हस्ते रविवारी सकाळी श्रीफळ वाढवून, कुदळ मारुन भुमिपुजन करण्यात आले.यावेळी प्रकाश कऱ्हाळे (शिवसेना तालुका प्रमुख),गणेश कदम, विशाल किरडे (शहर प्रमुख), अंकित कदम, लक्ष्मण कदम, विजुभाऊ कदम, सुनील सर इंगोले, नरेश कदम, राजू कदम, बाळू कदम व सर्व शिवसेना पधादिकारी उपस्थित होते.