डॉ.हरिभाऊ पाटील यांना पितृशोक
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील ज्येष्ठ सद्गुरूभक्त देवराव पाटील (मालीपाटील) यांचे दि.5 मार्च 2025 बुधवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने देहावसान झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षे होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना,नातू, नातसूना,पणतू असा मोठा परिवार आहे.
देवराव पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता.गावच्या मालीपाटीलकीची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.आकस्मिकपणे त्यांची प्रकृती बिघडली.त्यातच बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता धनगर टाकळी येथील गोदावरीकाठी वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पूर्णा येथिल विद्या प्रसारणी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ पत्रकार डॉ हरिभाऊ पाटील, य भगवानराव पाटील ,वामन उर्फ अनिल पाटील यांचे ते वडील होत.