श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी):

येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात शनिवारी ता.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करून ‘भारतीय संविधानातील महिलां विषयी तरतुदी’ या सदरात विद्यार्थ्यांनी लिखाण केले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकाराविषयी माहिती दिली तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य ,समता ,बंधुता या मूल्यासाठी निर्धारित केलेल्या विविध कलमांचीही राजकुमार यांनी माहिती करून दिली, यासोबतच विद्यार्थ्यांकडून संविधानातील कलमांचे वाचन करण्यात आले याप्रसंगी मनोगत कट्टामध्ये , या सदराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महिलांचे जीवन व कार्य संविधानामुळे कसे सुखकारक झाले आहे याकडे लेखांमधून लक्ष वेधले या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ ओंकार चिंचोले यांनी संविधानातील तरतुदींविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून आलेल्या शंकांची निरसन केले गेले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागातील डॉ अंबिका चोंडे

यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी घनश्याम कदम यांनी केले तर आभार विद्यार्थी अक्षय कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, डॉ.जी पी कापुरे,डॉ विजय पवार, डॉ वृषाली आंबटकर,डॉ. बालाजी असोरे,डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ संदीप शिंदे, डॉ विनोद कदम,डॉ स्वामी जे जे, याबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

You cannot copy content of this page