गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्णपदकाला गवसणी.
गडचिरोलीत पार पडलेल्या अंतर राज्य क्रीडा महोत्सवातील टेनिस बॉल स्पर्धेत मिळवलं यश..
पूर्णा(प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेतील टेनिस बॉल प्रकारात पूर्णेच्या श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंची घवघवीत यश मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत चंद्रपूर येथे नुकत्याच अंतर राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धेत स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या टेबल टेनिस मुलांच्या संघाने सहभाग नोंदविला होता.त्यात पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंही सहभागी होते स्पर्धेत संघीय प्रयत्नांच्या जोरावर स्वर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा चा विद्यार्थी अमिष आनंद आठवले याने टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहे. या स्पर्धेत अमिष आठवले यांनी नेत्र दीपक कामगिरी करून आपल्या संघाला सुवर्णपदक मिळून दिले आहे. आंतरराज्य क्रीडा महोत्सव टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २७ संघाने सहभाग नोंदविलेला होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संघाने महाराष्ट्रातील अनेक संघाला पराभूत करून पदक पटकावलेला आहे यात मुंबई, पुणे, सातारा, नागपूर, व कोल्हापूर या संघाला पराभूत केला आहे. या स्पर्धेत अमिष आठवले यांनी एकही मॅच न हरता आपला संघाला सुवर्ण पदक पटकावून दिलेले आहे. त्यास या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अमिष आठवले यांना मोलाचे मार्गदर्शन प्रा बरकुंटे. एस.आर यांचे लाभले. त्याच्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद अण्णा एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री प्रा. गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ के राजकुमार, उप प्राचार्य डॉ शिवसांब कापसे, उप प्राचार्य डॉ गजानन कुरुंदकर, प्रा.डॉ बर्डे आर.डी, पर्यवेक्षक श्री मिटकरी यु पी, उप प्राचार्य खराटे ऐ यन व सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.