कुलरचा शाॅक लागुन एकाच घरातील दोघींचा मृत्यू
पूर्णा तालुक्यातील गौर येथील घटना;चुडावा पोलीसात घटनेची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
दोन सख्ख्या जावांचा कुलरचा शाॅक लागुन मृत्यू ▶ पूर्णेतील गौर येथील घटनाईदनिमीत्य करत होत्या घराची स्वच्छतापूर्णा (प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील मौजे गौर येथे बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली असून, घरातील कुलरचा शाॅक लागुन दोन सख्ख्या जावांना आपला जीव गमवावा लागला असल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेची नोंद चुडावा पोलिसांनी घेतली आहे. बिस्मिल्लाबी इस्माईल शेख (वय ५८), शेख जहुराबी शेख युसुफ (वय ५८) या.नवी आबादी गौर ता.पूर्णा अशी त्या मयत महीलांची नावे आहेत.त्या दोघी रमजान ईद जवळ आल्याने बुधवारी २६ रोजी दुपारी १२ वाजे सुमारास घराची स्वच्छता करत असताना कुलरचा शॉक लागुन दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाला. विस्मील्लाबी ईस्माईल शेख (वय ५८अधिक माहिती अशी की, शेख जहुराबी या रमजान ईद निमित्त घर स्वच्छ करत होत्या. यावेळी त्यांचा कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला, जहुराबी यांना वाचविण्यासाठी गेलेल्या बिस्मील्लाबी यांनाही वीजेचा जोरदार धक्का लागला. दोघी जावा कुलरला चिटकल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनी. नरसिंग पोमनाळकर, विशाल बनसोडे, गायकवाड, बळीराम थोरे, गोडगे, पोलिस पाटील रामकिशन पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.घटनेने गौर गावात हळहळ व्यक्त होत आहे.