मस्जिद स्फोटप्रकरणी दोषींवर कारवाई करा-पूर्णेत मुस्लिम बांधवांचे निवेदन
पूर्णा /प्रतिनिधी–
बीड जिल्ह्यातील अर्धमसला येथे जामा मस्जिदमध्ये घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन पूर्णा येथील मुस्लिम बांधवांनी ता.३० मार्च रोजी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्फत पाठवले आहे. अर्धमसला येथील जामा मस्जिदमध्ये जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवण्यात आला. पोलिस तपासानुसार, विजय रामा गव्हाणे, आणि श्रीराम अशोक सागडे या दोन आरोपींनी हा कट रचल्याचे उघड झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र धार्मिक स्थळी असा प्रकार घडणे म्हणजे महाराष्ट्राच्या शांतता व सौहार्दावर घाला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.तसेच युएपीए अंतर्गत आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना दहशतवादी घोषित करावे.प्रकरणाचा एटीएसमार्फत तपास करावा.आरोपींची नार्को टेस्ट करून त्यांच्या इतर कटकारस्थानांचा तपास करण्यात यावा. असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मोहम्मद शफीक, शेख हिलाल, मन्नान शेख, जावेद शेख, असद चांद पाशा, शेख नईम, शेख मस्तान, इशू पठाण आदींसह शेकडो मुस्लिम नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.