स्वा.रा.तीर्थविद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉ. महाजनांची पूर्णेच्या परिक्षा केंद्रास भेट.
.पूर्णा( प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन यांनी येथील स्वा.सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रास (२३६) अचानक सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उन्हाळी परीक्षा २०२५ च्या परीक्षा ता. ०२ एप्रिल पासून सुरू झाल्या आहेत. या परीक्षा केंद्रावर कला वाणिज्य व विज्ञान पदवी वर्गाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत.शुक्रवारी ता.४ रोजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. अशोक महाजन आणि माजी कुलसचिव डॉ. ढवळे यांनी सदिच्छा भेट देऊन परीक्षा विभागाची पाहणी केली.परिक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार काटेकोर पुणे पार पडत असल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले .तसेच परीक्षेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करत मार्गदर्शन केले .याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे केंद्रप्रमुख डॉ.संतोष कुऱ्हे तर सहाय्यक केंद्रप्रमुख म्हणून डॉ.भारत चापके, सिनेट सदस्य डॉ.विजय भोपाळे, डॉ. संजय कसाब, डॉ.प्रभाकर कीर्तनकार, डॉ.प्रभाकर सूर्यवंशी, डॉ मारोती भोसले,डॉ.जितेंद्र देशमुख, डॉ. भीमराव मानकरे,प्रा .जगन्नाथ टोम्पे सहकारी सूर्यकांत भोसले,दत्ता कदम,ज्ञानोबा कदम,रामेश्वर भाले, ज्ञानोबा मुळे ,यादव कल्लाळीकर आदीं प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.