श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ पदवी परीक्षा सुरळीत
पूर्णा(प्रतिनिधी):
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित यंदाच्या वर्षीच्या उन्हाळी पदवी परीक्षा येथिल श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय केंद्रात शांततेत पार पडल्या.यावेळी १ हजार ५०० विद्यार्थी परिक्षेला बसले होते.
यंदाच्या वार्षीक परिक्षा २ एप्रिल पासून सुरु होत्या आज दिनांक ३० एप्रिल रोजी संपन्न झाल्या.परीक्षा साठी केंद्र प्रमुख म्हणून प्रा. डॉ. राजू शेख सहकेंद्र प्रमुख प्रा. डॉ.सातपुते एस.बी. सहायक केंद्र प्रमुख अलका कौसडीकर, ऑनलाईन तज्ज्ञ प्रा.डॉ. रवींद्र राख यांनी प्राचार्य डॉ.के. राजकुमार यांच्या मार्गदर्शन मध्ये कार्य केले.विद्यार्थी संख्या एकूण १५०० होती.परीक्षा केंद्राला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या त्या मध्ये प्र. कुलगुरू अशोक महाजन विज्ञान अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील सर, सिनेट प्रा डॉ अशोक मोटे प्रा. डॉ.माधव पाटिल प्रा डॉ. व्ही एम मोटे.
तसेच पूर्णा पोलीस स्टेशन चे पी. आय. विलास गोबाडे सर व ए. पी. आय. प्रकाश इंगोले व सोमनाथ शिंदे तसेच अजय माळकर, भीमराव धुतमल, बालाजी पुणेकर, वाल्मिकी भोसले व माने गोविंदवाड मेजर तोंडेवार यांनी उत्तम सहकार्य केले.परीक्षा यशश्वितेसाठी उप प्राचार्य प्रा. डॉ. गजानन कुरुदकर प्रा डॉ.शिवसांब कापसे सर्व प्राध्यापक वृंद तसेच श्री कापुरे एस.एम.श्री मंचक वळसे श्री गजानन भालेराव श्री नागोराव सावळे श्री कालिदास वैद्य यांनी परीक्षा विभागात मोलाचे कार्य केले.
कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा व्यवस्थित संपन्न झाल्या बदल सर्वाचे महाविद्यालय तर्फे प्रा.डॉ.के राजकुमार यांनी कौतुक केले.