खोटे गुन्हे दाखल करणा-या महावितरण अधीका-यास निलंबित करा..
खोटे गुन्हे दाखल करणा-या महावितरण अधीका-यास निलंबित करा..
पुर्णा तालुक्यातील भाटेगाव ग्रामस्थांची मागणी
पूर्णा प्रतिनिधी
कोणतीही पुर्व सुचना न देता गावठानचा विद्युत पुरवठा तोडणा-या महावितरण कंपनीच्या अधीका-यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेलेल्या भाटेगांव ग्रामस्थांशी अरेरावी करुन कार्यालयातुन हाकलून देत त्यांच्याच विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधीका-यांनी गुन्हा दाखल केला आहे.महावितरण अधीका-याच्या याजुलमी प्रकाराविरोधात ग्रामस्थही एकवटले असून संबंधित मुजोर,खोटे गुन्हे दाखल करणा-या अधीका-यास निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पुर्णा तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीने विज बील वसुलीसाठी महावितरणचे अधीकारी कर्मचारी फिरत आहेत.बुधवार २४ रोजी तालुक्यातील भाटेगांव येथे महावितरण कंपनीचे अधीकारी वीज बील वसुलीसाठी पोहचले.त्यांनी ग्रामस्थांना विज बीला बाबत कोणतीही पुर्व सुचना न देता संबंध गावाचा विद्युत पुरवठा तोडला.यावरुन येथिल येथिल शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश क-हाळे व १० ते १२ ग्रामस्थ पुर्णेतील महावितरण कंपनीच्या कार्यालयात उप अभियंता विश्वनाथ नाईक यांना याबाबत विचारणा करण्यासाठी पोहचले.त्यांनी यावेळी गावात सप्ताह सुरू आहे.गावात पाणी प्रश्न ऐरणीवर आहे नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे तुम्ही विद्युत पुरवठा तोडण्यापुर्वी कल्पना दिली असती तर ग्रामस्थांनी वीज बील भरले असते म्हणाल्या नंतरही उप अभियंता नाईक यांनी ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषा केली. विद्युत पुरवठा जोडणार नाही असे सांगितले व कार्यालयातुन हाकलून दिले.व यानंतर त्यांनी पुर्णा पोलीस ठाण्यात जाऊन सदरील लोकांविरुद्ध शासकीय कार्यालयात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी येथिल शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रकाश क-हाळे व अज्ञात ८ जणांविरुद्ध पुर्णा पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.एकीकडे गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यावर भाटेगांव येथिल ग्रामस्थ संतापले असुन खोटी कार्यवाही करणा-या महावितरणचे बेजबाबदार मुजोर उप विभागीय अभियंता नाईक यांना निलंबित करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना युवानेते विक्की कदम, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, अँड गोविंद शिंदे भाटेगांव येथिल महीला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.












