भ्रष्टाचार विरोधी समिती पूर्णा यांचा तर्फे डी.आर.एम. कार्यालयासमोर उपोषण चा इशारा
भ्रष्टाचार विरोधी समिती पूर्णा यांचा तर्फे डी.आर.एम. कार्यालयासमोर उपोषण चा इशारा
पूर्णा /प्रतिनिधि
पूर्णा रेल्वे डिझेल डेपोतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची डिझेल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरीही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासात कसून लक्ष न दिल्याने या प्रकरणातील दोषींना सहज जामीन मंजूर झाली. या डिझेल चोरीमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचा सहभाग असल्याने तपास अधिकाऱ्यांनी आपला तपास योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळे डिझेल चोरीचे प्रकरण रेल्वे सुरक्षा दलाच्या बाहेर काढून सीबीआय शाखा सुपूर्द करण्यात यावी. तसे न केल्यास भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने 26 मार्चपासून लोकशाही मार्गाने डी.आर.एम. कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी समिती पूर्णा तर्फे करण्यात आली आहे.