भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले ३ जणांचा जागीच मृत्यू
परभणी-वसमत महामार्गावर आसोला शिवारातील घटना ; मयत हिंगोली जिल्ह्यातील अंजनवाडीचे रहीवाशी
पूर्णा/प्रतिनिधी:
परभणी-वसमत महामार्गावरील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोला शिवारात आज एका भरधाव ट्रॅक्टरने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीच्या उडवल्याची घटना ( दि.१० )नोव्हेंबर रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली .या अपघातात एकाच कुटूंबातील पती पत्नी सह त्या़ंच्या ११ वर्षीय मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एकनाथ बाबाराव घुगे (वय ३६) वर्ष, शुभांगी एकनाथ घुगे (वय ३०) व समर्थ एकनाथ घुगे( वय ११) वर्ष रा.अंजनवाडी ता.औंढा नागनाथ जि.हिंगोली अपघातात मयत झालेल्या मृतांची नावे आहेत.सदरील मयत कुटुंबीय हे रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकी क्र.एम.एच.३८ ए.सी.८३७१ वरुन
हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातल्या अंजनवाडी येथे जात होते.दरम्यान ते असोला शिवारातून जात असताना समोरून परभणीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका नांगरटीच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक एवढी जोरदार होती की यात दुचाकीवरील तीघेही दुचाकीसह रस्त्यावर आदळले व त्यांच्या जागीच मृत्यू झाला.धडक होताच ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरुन पसार झाला आहे.रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी सदरील घटनेची माहिती पोलिसांना कळवली.माहीती मिळताच ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धावून मदतकार्य सुरु केले.
