शेतकऱ्यांना देशोधडीला लावणा-या महायुती सरकारला सत्तेतुन खाली खेचा-देसाई

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी
राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. शेतमालाचे भाव पाडले, हमीभाव दिला नाही.लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे. मोदी सरकार आले तेव्हा तर पंधरा लाख देऊ असे आश्वासन दिले आता १५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत, त्यामुळे या लबाड सरकारला सत्तेतून खाली खेचा अशी टीका पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ता.अ.शहाजीराव देसाई यांनी केली.

     गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ देसाई व मान्यवरांनी पिंपळाभत्या,कलमुला,आलेगांव, धानोरा ,पेनूल (ल) सातेफळ आदीं गावात दौरा केला.यावेळी धानोरा मोत्या येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.प्रसंगी शिवसेना नेते मा.सभापती बालाजीराव देसाई,ता.प्र.काशिनाथ काळबांडे,पं.स.सभापती अशोक बोकारे,श्रीधर पारवे,कृ.उ.बा.सभापती बालाजी खैरे,काँग्रेसचे ता.अ.प्रल्हादराव पारवे, हनुमंत डाकेकृबास.चे उपसभापती नारायण पिसाळ, उप ता.प्र.बालाजी वैद्य , अमृतराव कदम, तुकाराम चव्हाण, ज्ञानोबा वंजे चंपतराव मोहीते कैलास वाघ , परमेश्वर भालेराव, शिवाजी मोहीते हरि भाऊ वाघ ,बालाजी पिसाळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीकडे टीका करण्यासारखे आता काहीच उरले नसल्याने महायुतीचे नेते खोटे बोलून रडीचा डाव खेळत आहेत. राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून मोठया प्रमाणात गुन्हेगारीही फोफावली आहे. त्यांना मतदार राजांनी धडा शिकवला पाहिजे अशी टिका त्यांनी केली.

विकासाचे व्हिजन राबवू शकणा-या विशाल कदम यांच्या पाठीशी रहा..
या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडीचे विकासाचे शिलेदार निवडून द्यायचे आहेत.  सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारा  जमीनीवर पाय असलेल्या  विशाल कदम यांच्या कडे विकासाचे व्हिजन मतदारसंघात राबण्याची. क्षमता आहे. गंगाखेड मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय दिवे लावले, हे आपण पाहिले आहे.मतदार संघाचा विकास खुंटला आहे तो करुन घेण्यासाठी मतदार संघाचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर  गंगाखेड मतदार संघातील जनतेने मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे  असे आवाहन पूर्णा बाजार समितीचे मा.सभापती बालाजीराव देसाई यांनी केले.

You cannot copy content of this page