गंगाखेड मध्ये तरुण नेतृत्वाला संधी द्यावी खा.बंडू जाधव

Spread the love

विशाल कदम यांच्या प्रचारार्थ सदर संजय जाधव यांचा पालम, गंगाखेड तालुक्यात प्रचार दौरा

पूर्णा/प्रतिनिधी

गंगाखेड मतदार संघात कदम विशाल विजय कुमार सारख्या तरुण उमेदवाराला संधी दिल्यास तो संधीचे सोने करेल  तिन्ही तालुक्यांचा विकास घडवून आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मतदारांनी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने त्याला विजयी करावे, असे आवाहन खासदार श्री. संजय उर्फ बंडु जाधव यांनी केले.
   विधानसभा निवडणुकीची प्रचार मोहीम आता वेग घेत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांच्या प्रचारार्थ खासदार श्री जाधव पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते.शहर व ग्रामीण भागातील ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
  प्रचार कार्यालयाचे उद्घाटन,महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सर्वसामान्य मतदाराच्या कॉर्नर बैठका घेऊन प्रचार कार्याचा आढावा त्यांनी घेतला.कार्यकर्त्यांनी सावध राहून घरोघर मतदारांशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नशील राहावे.आपले गाव,प्रभाग येथे बुथनिहाय प्रचारकार्याची जबाबदारी पार पाडावी.महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे,मात्र गाफील राहू नका,अशा सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
  मतदारांशी संवाद साधतांना खासदार श्री जाधव यांनी  विधानसभा निवडणुक ही परिवर्तन घडून आणणारी आहे. ही निवडणूक शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या धनदांडग्या राक्षसाला धडा शिकविणारी ठरली पाहिजे.असा धडा की पुन्हा कोणी शेतकऱ्याच्या वाट्याला जाऊ नये. ही निवडणूक दहशत निर्माण करणाऱ्याचा माज उतरविणारी ठरली पाहिजे.ही निवडणूक लोकात सहजपणे मिसळू शकणाऱ्या कदम विशाल विजयकुमार सारख्या तरुण तडफदार नेतृत्वाला संधी देणारी ठरावी. महाविकास आघाडीच्या मागे मतदारांनी भक्कमपणे उभे राहावे.विकासाची अनेक कामे मार्गी लावू,त्यात विशाल कोठेही कमी पडणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या प्रचार दौऱ्यात गंगाखेडचे माजी आ. मधुसूदन केंद्रे, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, बाळासाहेब दाढेल, सुशांत चौधरी, उपजिल्हाप्रमुख मनोज काकांनी विष्णू मुरकुटे आणि सातपुते जितेश गोरे राष्ट्रवादीचे शंकरराव मोरे अन्वर खान काँग्रेसचे गोविंद यादव शेख
युनुस, पालम तालुक्यातील श्रीकांत कराळे किशोर घोरपडे अर्जुन डोंगरे सुभाष पाटील परमेश्वर दिवटे शिवाजी खंडागळे काँग्रेसचे कृष्णा भोसले अहमद भाई विजयकुमार शिंदे केशव कराळे, पुर्णेचे उत्तमराव कदम, शहाजीराव देसाई,प्रल्हादराव पारवे,काशिनाथ काळबांडे,बालाजीराव देसाई,बालाजी वैद्य इत्यादीसह पालम,गंगाखेड तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page