परभणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर राहील – सुरज कदम
परभणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर राहील – सुरज कदम
पूर्णा शहर पत्रकारांच्या वतीने नवनिर्वाचित मराठी पत्रकार संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष सूरज कदम यांचा भव्य सत्कार…
पुर्णा (दि.२७ फेब्रुवारी) – पत्रकारिता क्षेत्रात काम करताना अडचण आल्यास पत्रकार संघटना सदैव आपल्या पाठीशी तत्परतेने उभी राहील अशी ग्वाही मराठी पत्रकार संघटनेचे नूतन परभणी जिल्हाध्यक्ष सुरज कदम यांनी दिली. यावेळी त्यांचा भव्य सत्कार
पुर्णा शहर पत्रकाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रभु दिपके,इफत्तेखार,राजकुमार हट्टेकर,राजु कर्डिले,बनकर,ढबाळे यांचा ही सत्कार पुर्णा शहराच्या वतीने केला.यावेळी पत्रकार जाकीर पठाण, पत्रकार दिलीप जोंधळे, पत्रकार चंद्रकांत उगळे, पत्रकार रविंद्र नरवाडे आदीनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.












