अज्ञात चोरांनी पळवला ६ लाखांचा मुद्देमाल..!
पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील घटना; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
पूर्णा/प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे सुरवाडी येथे अज्ञात चोरट्यांने घरात शिरुन घरफोडी करत सोन्या – चांदीचे दागिणे व रोख रक्कम मिळून ५ लाख ९५ हजार ९२५ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी घडल्याचे उघडकीस आले असून. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे एका अज्ञात चोरट्यांनी गावांतील रहिवासी तातेराव पाचकोर यांचे घर फोडत सोन्याच्या १० नग लक्ष्मीच्या पुतळ्या, कानातील झुंबर, सोन्याच्या अंगठ्या, चार लाख रूपये रोख असा एकूण ५ लाख ९५ हजार ९२५ रुपयाचा मुद्देमाल लंपास केला असल्याची तक्रार पूर्ण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.पूलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.याप्रकरणी तातेराव पाचकोर यांचे फिर्तयादीवरुन पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सपोनि.सोमनाथ शिंदे करत आहेत. घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. दरम्यान मागील काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरटे बंद असलेली घरे लक्ष करत असल्याचे दिसत आहे. पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.