गावपातळीपर्यंत नागरी सुविधा पोहचविणार- आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
धारखेड, नागठाणा, मुळी गावांना भेटी ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत
गंगाखेड/प्रतिनिधी : गंगाखेड मतदार संघातील प्रत्येक गाव तांड्यावर व डोंगरावर वीज, पाणी पोहचवून तेथील नागरीकांना सुविधा देण्याचा मानस असल्याचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर केले. महायुती पुरस्कृत रासपाचे उमेदवार आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सोमवार ११ नोव्हेंबर रोजी नागठाणा, धारखेड आणि मुळी या गावांना भेटी दिल्या. तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांना बोलताना आ.गुट्टे म्हणाले की,मला काम करायला तसे दोन वर्ष सत्तेत राहून मिळाले.तरीही मी या दोन वर्षात विकासाची मोठी कामे केली. ३०० गावांत विकास कामे केली आहेत.गावपातळीवर आणखी नव नवीन कामे येत्या पाच वर्षांत करण्याचा मानस आहे. यापुढे ग्रामीण भागात २४ तास वीज देण्याचा माझा प्रयत्न राणार आहे. सोलार देखील शेतकर्यांना देऊन शेती पंपाची सोय करणार आपल्या पुढील कार्यकाळात विकासाची कामे करताना ग्रामीण भागातील गाव तांड्यावरील प्रत्येक नागरीकांना सुविधा पोहचविणे एवढेच माझ्या डोक्यात असल्याचे सांगितले. मतदार संघातून गोदावरी नदी वाहते. या नदीवर अनेक प्रकल्प राबविणार आहे. कारण वीज नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गावठाणला देखील वीज मिळत नाही. डोंगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. वीज व पाणी हा प्रश्न मी मार्गी लावणार असल्याचे आ.गुट्टे यांनी सांगितले. यावेळी गावातील ग्रामस्थ व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.