रिलायबल अँग्रो फुड कंपनीत स्वच्छता पंधरवडा
पूर्णा/प्रतिनिधी
येथील रिलायबल ॲग्रो फुड्स च्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात आले.येथील रिलायबल ॲग्रो फुड्स च्या वतीने सोमवारी (ता. ११) सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता याबाबत अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत जनजागृती व प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी शाहीद हुसेन यांनी वैयक्तिक स्वच्छते इतकेच सार्वजनिक स्वच्छतेला सुद्धा महत्त्व आहे असे सांगत आपण सार्वजनिक जीवनात वावरताना सार्वजनिक स्वच्छता ही जपली पाहिजे. कुठेही घाण टाकून सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक काही नियम व बंधने स्वतःला घालून घ्यायला हवीत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरनाथ पटेल, डॉ. मोहम्मद अय्युब, अब्दुल समद आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अब्दुल समद यांनी केले.