वंचितला मतं म्हणजे जातीवादी शक्तींना मतदान-विजय वाकोडे

Spread the love

रिपब्लिकन सेनेचा आ.डाॅ.रत्नाकर गुट्टेंना जाहीर पाठिंबा

पूर्णा/प्रतिनिधी
डॉ.आंबेडकर चळवळीतील लोकांनी विकासरत्न असलेल्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनाच मतदान करावे कारण वंचित आघाडीला मतदान करणे म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या महाविकास आघाडीला मतदान करणे होय. आंबेडकरी विचारांची जनता गंगाखेड मतदार संघातील उमेदवार डॉ . गुट्टे यांना  मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहे.त्यामुळे मतदारसंघातील जनतेने रासपाच्या आ.डॉ.गुट्टे यांना मतदान करावे असे आवाहन रिपब्लिकनचे नेते विजय वाकोडे यांनी केले आहे.  
पुर्णा येथे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या कार्यालयात मंगळवारी १२ रोजी दुपारी रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.प्रसंगी व्यासपीठावर कवाडे गटाचे गौतम मुंडे, रवि कांबळे, माजी नगरसेवक अँड .हर्षवर्धन गायकवाड, नितीन उर्फ बंटी कदम,विरेश कसबे,मित्र मंडळाचे  तालुका अध्यक्ष गणेश कदम,धम्मा जोंधळे,अनिल खर्गखराटे, साहेबराव वाटोडे,लिंबाजी भोसले, दिलीप गायकवाड, ॲड.जिंतेद्र सोनसळे प्रमोद खिल्लारे,नवाब पटेल मुकुंद भोळे सह आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आभार प्रदर्शन ॲड.जिंतेद्र सोनसळे यांनी केले.पुढे बोलताना विजय वाकोडे म्हणाले कि ,आ डॉ रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या मतदार संघात चांगले विकासात्मक कामे केली आहेत. पुढे त्यांनी प्रत्येक गावात बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प  केला आहे.अनेक गावांतील बौद्ध  स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला आहे. पूर्णा येथील ओव्हर ब्रिजचा प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही ही दिली आहे.त्यामुळे आंबेडकर चळवळीच्या वतीने आ.रत्नाकर गुट्टे यांना जाहीर पाठींबा देण्यात येत आहे.डॉ. गुट्टे हे सर्व जातीच्या लोकांना न्याय देण्याचे काम करत आहेत.
त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा षड्यंत्र जातीवादी लोक करत आहेत.आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीच्या नादी न लागता थेट गुट्टे यांना मतदान करून निवडून आणायचे आहे. असे आवाहन रिपब्लिकनचे नेते विजय वाकोडे यांनी पत्रकार परिषदेत केले .

You cannot copy content of this page