मतदारसंघातील विकास कामांची पावती मतदारच देतील-आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे
पूर्णा तालुक्यात महायुती पुरस्कृत आ.डॉ. गुट्टे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद
पूर्णा/प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणला. तो सर्वच घटकांसाठी सर्व समावेशक पद्धतीने वापरून.गावपातळीवरील विकासाला चालना दिली आहे. वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच मी ही निवडणुक लढवत आहे.या निवडणुकीला सामोरे जात असताना मला कोणावर टीका-टिप्पणी करण्याची काहीही गरज नाही.शेवटी गंगाखेड मतदारसंघातील सुजाण जनता केलेल्या विकासाची पावती म्हणून मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल अशी अपेक्षा महायुती पुरस्कृत रासपचे उमेदवार आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महायुती पूरस्कृत उमेदवार आ. डॉ.रत्नाकर गुट्टे हे बुधवारी १३ रोजी पूर्णा तालुक्यातील प्रचार दौर्याच्या होते यावेळी त्यांनी तालुक्यातील गौर, नर्हापूर सह सोन्ना, धनगर टाकळी, भाटेगाव, पिंपळगाव, पिंपळगाव लिखा तसेच पालम तालुक्यातील रावराजूर, उमरथडी, आरखेड आणि केरवाडी आदीं गावात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मतदार संघातील गावा -गावांतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक नागरिक मला मोठ्या प्रमाणात आपला पाठिंबा जाहीर करत असल्याने विरोधाकांचे धाबे दणाणले आहेत. मतदार संघात विकासाची मुहूर्तमेठ रोवल्यामुळे सर्व सामान्य जनतेने विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा जनसेवक म्हणून सेवेची संधी द्या, असे आवाहन आ.डॉ.गुट्टे यांना केले. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब जाधव,बळीरामजी कदम,छगनराव मोरे, सरपंच ढोणे आदीं महायुती,रासपा, डॉ रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.