मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ बाजारपेठेत भव्य रॅली
गंगाखेड निवडणुकीची रणधुमाळी;व्यापा-यांच्या प्रत्यक्ष भेटी
पूर्णा/प्रतिनिधी
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना मतदार संघात मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या प्रचारार्थ (दि.१३) नोव्हेंबर रोज बुधवारी गंगाखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अँड. मिथिलेश केंद्रे मविआच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्य बाजार पेठेत रॅली काढून व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते आहे.मविआ घटक पक्षातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांनी सहका-यांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे.बुधवारी कदम हे गंगाखेड तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते.मविआतील युवा नेते अँड. मिथिलेश केंद्रे यांच्या पुढाकारातून शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील पोस्ट ऑफिस जवळील मारोती मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी रॅली मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम, माजी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, सुनिल चौधरी, प्रमोद मस्के, अन्वर खान, अँड. मनोज काकाणी, अँड. मिथिलेश केंद्रे, गोपीनाथ लव्हाळे, संजय तिरवड, गोविंद आय्या, जितेश गोरे ,लिंबाजीराव देवकते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.सराफा मार्केटसह मुख्य बाजार पेठेतून पोलीस ठाण्यासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत उमेदवार कदम व सर्वांनी प्रत्येक दुकानावर जाऊन व्यापाऱ्यांची भेट घेत महाविकास आघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत क्षितिज चौधरी, मोहसीन खान, आदनान खान, सुधाकर मुंडे, रजत गायकवाड, शेख ताजोद्दीन, अमोल खटिंग,गोविंद जाधव, पृथ्वीराज चौधरी, राजेश जाधव, बंडू सौंदळे, अभिषेक चौधरी, सय्यद इस्माईल, अंगदराव बंगाळ, अँड. सद्दाम खान, परमेश्वर कदम, सय्यद इस्तियाख, सतिश क्षिरसागर, कुंडलिक भडके आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.