बळीराजा शुगर्सचा ऊसाला ३ हजार रुपये भाव- जाहीर

Spread the love

११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ;शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते बाॅयलर अग्नीप्रदीपन व मोळी पुजन संपन्न

पूर्णा/प्रतिनिधी

येथिल बळीराजा साखर कारखान्याचा ‘बाॅयलर अग्नीप्रदीपन’व  मोळी पुजन शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव भगवानराव जाधव यांच्या शुभहस्ते (दि.१३) वार बुधवार रोजी साय. ५ वाजता कारखाना साईडवर पार पडला.११ व्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असून,कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे .

    पूर्णा येथिल  कानडखेड शिवारातील बळीराजा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ‘बाॅयलर अग्नीप्रदीपन’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव भगवानराव जाधव , जेष्ठ संचालक मा. श्री. दिनकरराव भिमराव जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी वसुंधरा जाधव यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी कार्यक्रमास  मा. नगरअध्यक्ष उत्तमराव कदम मार्केट कमेटी मा. उपसभापती लक्ष्मणराव बोबडे, अॅड.सईद, गंगाधर धवन मामा, बाबुराव बोबडे व मान्यवरांसह जनरल मॅनेजर भगवान मोरे,वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे,चिफ केमिस्ट किरण मगर,मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रिीक मॅनेजर नितीन गणोरकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक क-हाळे,रामजी शिंदे,बालासाहेब तिडके सुरक्षा अधिकारी विनायक कदम,टाईम किपर गणेश सुर्यवंशी, महेश हेबळे ,पत्रकार जगदीश जोगदंड,दौलत भोसले यांच्यासह, कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी, ऊस तोड वाहतुक ठेकेदार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी  माधव मोहीते यांनी आभार मानले.

बळीराजा देणार ऊसाला ३ हजार रुपये प्रतिटनाचा भाव -शिवाजीराव जाधव
कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ६,१२,६६३ मे. टन ऊसाचे गाळप करून ७,१५,८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. त्यानुसार साखर उतारा ११.८९ टक्के आला असुन निव्वळ देय एफआरपी प्रति टन २,८०४.८४ रू. अंतिम झाला असुन ही सर्व रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली असुन कारखाना प्रशासनाने जाहीर केल्या प्रमाणे उद्यिष्ट पुर्ण केले आहे.सन २०२४-२५ गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासद शेतकरी यांचा ऊस गाळपासाठी बळीराजा साखर कारखाना आणणार आहे. कारखाना हंगाम २०२४-२५ मध्ये  ऊस दर प्रती मे. टन रू.३, हजार दर निश्चित केला असुन , सरासरी साखर उतारा वाढल्यास रू.३, हजार पेक्षाही जास्त ऊस दर राहील असा अंदाज आहे. त्यानुसार पहीली उचल रू.२ हजार ५०० प्रती मे. टन व उर्वरीत करारानुसार समान दोन हप्त्यामध्ये एफ आर पी प्रमाणे राहील. साखर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा, ऊस वाहतुक यंत्रणा, कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर असुन बळीराजा कारखान्यास जास्तीत जास्त शेतक-यांनी आपला ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे. असे आवाहन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे. 

You cannot copy content of this page