नाभिक समाज,जीवा सेना व करणीसेनेचा विशाल कदम यांना पाठिंबा
पूर्णा/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे मविआचे अधिकृत उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना सर्व समाज बांधव बिनशर्त पाठिंबा देत आहेत.
सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, गंगाखेड विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली आहे.या निवडणुकीसाठी नाभिक समाज व अखिल भारतीय जीवासेना पूर्णा पालम गंगाखेड संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत करोता आपणास आम्ही जाहिर पाठिंबा देत असल्याचे समाजाच्या वतीने सदाशिव सूर्यवंशी(अखिल भारतीय जिवा सेना)जिल्हा प्रवक्ता परभणी गजानन वाघमारे संत सेना महाराज मंदिर,अध्यक्ष पूर्णा अखिल भारतीय जिवा सेना शहर अध्यक्ष पूर्णा राम सूर्यवंशी
अखिल भारतीय जिवा सेना, जिल्हा अध्यक्ष परभणी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री राजपूत करणी सेनेचा जाहीर पाठिंबा…
राजपूत समाजाच्या व राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर लढा देणाऱ्या श्री राजपूत करणी सेनेने मला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी करणी सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष शैलेंद्रसिंह ठाकूर, मराठवाडा कार्याध्यक्ष सुनील ठाकूर, जिल्हा कार्याध्यक्ष भारत राणा मोरे यांच्यासह तमाम राजपूत समाजबांधवांचे आभार व्यक्त करत यापुढील काळात आपल्या हितासाठी वचनबद्ध राहणार असल्याचा शब्द दिला.