वंचितच्या उमेदवारांसाठी पुर्णेत आज भिमराव आंबेडकर यांची जाहीर सभा..

Spread the love

सितारामजी घनदाट(मामा) यांना मतदार संघात मिळतोय वाढता पाठिंबा.

पूर्णा(प्रतिनिधी);गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.आ.सितारामजी घनदाट मामा यांच्या प्रचारार्थ आज (दि.१५) नोव्हेंबर रोज शुक्रवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ११.०० वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्माननीय भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
२०२४ विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचारात रंगत होताना दिसत आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १२ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष प्रचारात मात्र केवळ चार ते पाच उमेदवार प्रचार करत आहेत.मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सितारामजी घनदाट यांच्यात प्रचारार्थ पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी आयोजित या प्रचंड जाहीर सभेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर हे संबोधित करणार आहेत .तरी या सभेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तमाम आंबेडकरी जनसमुदायासह वंचित बहुजन समाज बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे, माजी नगराध्यक्ष दिलीप हानवते, माजी नगरसेवक दादाराव पंडीत, अॅड. हिरानद गायकवाड, युवा नेते रवी वाघमारे, युवा नेतृत्व राज नारायनकर, सिताराम गायकवाड, इंजिनिअर अमोल किशन गायकवाड यांनी केले आहे…..

You cannot copy content of this page