सितारामजी घनदाट यांना विधानसभेत पाठवा मी त्यांना मंत्री करतो-भीमराव आंबेडकर
पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सितारामजी घनदाट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
पूर्णा/प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जवळपास 25 ते 30 उमेदवार निवडणुकीत आघाडीवर आहेत वंचित या निवडणुकीत चांगल्या क्रमांकाने विधानसभेत पोहोचणार आहे सत्ता कुणाचीही येऊ सत्तेच्या चाव्या मात्र वंचित आघाडीकडेच राहणार असल्यास दावा भीमराव आंबेडकर यांनी केला आहे गंगाखेड मतदार संघाचे उमेदवार सिताराम घनदाट हे वंचित आघाडीच्या उमेदवारापैकी सर्वात जास्त आघाडीवर आहे. त्यांना केवळ धक्का देऊन तुम्ही विधानसभेत पाठवा आम्ही त्यांना आमच्या कोट्यातून मंत्रीपद देतो असे जाहीर वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले आहे.
पूर्णा येथे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सितारामजी घनदाट यांच्या प्रचारार्थ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. मंचावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सितारामजी घनदाट, यांचे नातू, अमित घनदाट सह दादाराव पंडित, सुनील मगरे ,उत्तम भैया खंदारे ,तुषार गायकवाड, शामसुंदर काळे, दिलीप हनुमंते, सुनील गायकवाड, सुनील जाधव, प्रीतम रणवीर ,विजय खंडागळे , सुनील जाधव,राजू नारायणकर, दयानंद कदम, गोपीनाथ तोडणे, ढेले आप्पा, डी के पाटील, बुचाले मामा, शेख चांद ,मगदूम कुरेशी, सलीम भाई ,बाळू जोगदंड, प्रभूत काळे, सुकेशनी गोधने, अजय काळे, अहमद मिरची वाले, माधव भगत, पाशाभाई रणगडे, मसरत जानी, शेख सिराज, आदी मान्यवरांची उपस्थिती होती उमेदवार सितारामजी घनदाट,दादाराव पंडित, उत्तम भैया खंदारे ,राज नारायणकर यांनी मत व्यक्त केली.
पुढे बोलताना भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रासह देशात सत्ताधाऱ्याकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे.संविधान बदलण्याची भाषा सत्ताधारी बोलून दाखवत आहेत.यामुळे समाज यावेळी सत्ताधाऱ्यांना जागा दाखवणार आहे. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांचा खुपसून समाचार घेतला.राज्यातील जनता महागाई महिला अत्याचार आरक्षण बेरोजगारी या मुद्द्याने त्रस्त आहे शेतकरी कष्टकरी जनता देशोधडीला लागली आहे. येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा आहे राज्यांमध्ये सत्ता कोणाचीही येऊ वंचित आघाडीच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही सत्तेची फळे चाखता येणार नाहीत त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या घनदाट यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवा गंगाखेड मतदार संघाला आम्ही आमच्या कोट्यातून मंत्रीपद देऊ असेही त्यांनी बोलून दाखवले.
जनसेवेला प्राधान्य दिले पैश्याला नाही -सितारामजी घनदाट
मी तीन वेळा गंगाखेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पैसा माझ्याकडे खूप आहे परंतु तो केंद्रस्थानी न मानता मी मतदार संघातील विकासाला प्राधान्य दिले आहे पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीवर पूल करून पालम आणि गंगाखेड तालुक्याला जोडले आहे.रस्ते ,पाणी ,लाईट या समस्या देखील मीच सोडवली आहे.पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव कडे जाणारा 29 कोटी रुपयांचा रस्ता एका उमेदवाराने कागदोपत्री उचलून खाल्ला आहे तसा मी कोणताही पैसा उचलून खाल्लेला नाही आणि खाणारही नाही मी माझे आयुष्य जनसेवेसाठी सार्थकी घातले आहे मतदारांनी मला मतदान रुपी दान देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सितारामजी घनदाट यांनी केले.