गंगाखेड येथे ३१ फे-यांत होणार मतमोजणी

Spread the love

१४ टेबल,ईव्हीएम,टपाली मतं मोजली जाणार; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

पूर्णा/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी २३ रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण  महाविद्यालयात पार पडणार असुन, प्रशासनाच्या वतीने यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.१४ टेबलवर एकुण ३१ फेऱ्या व ८ टेबलवर टपाली मतांची मोजणी ही मतमोजणी केली जाणार असल्याचे सह निवडणुक अधिकारी जीवराज डापकर यांनी कळवले आहे. गंगाखेड विधानसभेचा नवा आमदार  कोण हे अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
   राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची मतदान प्रक्रिया बुधवार २० नोव्हेंबर रोजी पार पडली. याची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे.गंगाखेड मतदार संघात मतदारांनी ७३.४ टक्के विक्रमी मतदान केले. गंगाखेड येथे शनिवारी श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चौदा टेबलवर केली जाणार आहे. गंगाखेड ,पालम ,पूर्णा तालुक्यातील  एकूण ४३२ मतदान केंद्रातील मतदान यंत्रांतील मतांची संख्या मोजली जाणार आहे.धारासूर येथील मतदान केंद्रापासून सुरु होणाऱ्या मतमोजणीचा शेवट एकूण ३१ फेऱ्या मानकादेवी येथील मतदान केंद्रावर होणार आहे.  १४ मतदान केंद्राच्या ३० व १२ मतदान केंद्राची १ अशा एकुण ३१ फेऱ्यात ४३२ मतदान केंद्रातील मतमोजणी पूर्ण केली जाणार असुन पोस्टल मताची मोजणी ८ टेबलवर केली जाणार आहे.तीरंगी लढत झालेल्या गंगाखेडमध्ये आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे विजयी होणार की महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत बाजी मारणार ? निवडणुकीत बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी घेत निवडणुक लढविणारे माजी आ. सिताराम घनदाट मामा नवा इतिहास घडवणार हे मात्र शनिवार रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page