गंगाखेड विधानसभेसाठी ७३.४% मतदान
कदम,घनदाट,की गुट्टे चर्चेला उधाण;वाढलेल्या मतांचा टक्का कोणाचे गणित बिघडवणार
गंगाखेड(प्रतिनिधी)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारसंघातील जनतेने ऐतिहासिक मतदान करुन मतांची टक्केवारी अगदी सत्तरी पार नेऊन सोडली आहे.वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा प्रत्यक्ष कुणाला फायदा होईल यामुळे कुणाचे गणीत बिघडेल याचे तर्कवितर्कांना लावले जात आहेत,शनिवारी२३ रोजी मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी कदम, घनदाट की गुट्टे नेमकी कोण बाजी मारणार या चर्चेला उधाण आले आहे.
राज्यासह परभणी जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण विधानसभा असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या पूनर्रचनेनंतर या मतदारसंघावर कोणत्याही एका पक्षाचे बऱ्याच कालावधी साठी वर्चस् राहिलेलं नाही.प्रथमतःयेथून अपक्ष सितारामजी घनदाट २०१४ मध्ये एनसीपीचे मधुसूदन केंद्रे आमदार होते.यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासपच्या) डॉ.रत्नाकर गुटे यांना तुरुंगात असताना जनतेने निवडून दिले होते.ते सध्या विद्यमान आमदार आहेत. त्याआधी, त्यापुर्वी गंगाखेडची जनता अनेकदा एकाच पक्षाला संधी न देता वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत आली आहे.यानिवडणुकीत मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केले.वाढीव मतदान निवडणुकीत कोणाचं गणीत बिघवणार हे पाहणं औचित्याचे आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटात कडून विशाल विजयकुमार कदम तर महायुती पुरस्कृत रासपचे विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणी मविआकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले मा.आ. सितारामजी घनदाट यांच्यात तीरंगी लढत झाली आहे.उर्वरीत ९ उमेदवारांचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नाही.
मतदार संघातील शहरी भागसह गोदापट्टा,डोंगरपट्टयातील मतदारांच्या मतांच्या जोरावरच उमेदवारांला गंगाखेडचा किल्ला सर करता येतो हे या मतदारसंघातील समीकरण आहे.मतदान प्रकीया पार पडली आहे.यानिवडणुकीत येथुन कोणी मताधिक्य मिळवले.याचे तर्कवितर्क आता लावले जात आहेत. निवडणुकीत जरांगे फॅक्टर, दलीत,मुस्लिम,ओबीसी मतादारांची गणीतं जुळवाजुळ करण्यासह मोठ्या प्रमाणात ही निवडणुकीत लक्ष्मी अस्त्रांचा मारा झाला असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.मागील काही वर्षात राज्यातील राजकीय घडामोडीचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला.महाविकास आघाडीतील घनदाट यांची बंडखोरी वगळता मवविआ घटकपक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते एकदिलाने लढले तर महायुतीत मात्र मोठी बिघाड झाल्याचे दिसून आले.प्रचारा दरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या गेल्या.मतदार संघात पैसे वाटपासह जातीय समीकरणांचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला.मतदार संघातील जनता दरवेळी बदल करते हे गणीत जर या निवडणुकीत मतदारांनी ठेवले तर विद्यमान आमदारांना मोठा धक्का बसु शकतो.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता २० नोव्हेंबर रोजी पालम,पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील ४३२ मतदान केंद्रावर एकूण ४ लाख २१ हजार २७२ मतदारांपैकी ३ लाख ७ हजार ६८३ मतदारांनी आपल्या मतांचा हक्क बजावला. झालेल्या मतांची टक्केवारी ७३.०४ टक्के एवढी आहे.त्यात लाडक्या बहीणींपेक्षा लाडक्या भावांची मतदानांची टक्केवारी अधीक आहे.मतदान प्रक्रिया पार पडली. आता गाव, वाड्या, वस्त्या, जागोजागी आपला आमदार कोण याची चर्चा रंगली आहे जो तो आप आपल्या परिने विजयाची गणीत मांडत आहे.अवघ्या काही तासांतच मतदार संघातील नवा आमदार कोण हे कळणार असल्याने सर्वांचे लक्ष मतमोजणी कडे लागले आहे.
