परभणी;जिंतूर- बोर्डीकर,पाथरी-विटेकर, गंगाखेडात-डॉ.गुट्टे तर परभणीत-डॉ.राहुल पाटील यांची हॅट्रीक
परभणी(प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून,जिंतूर येथे भाजपच्या आ.मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा,पाथरी येथून प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे आ.राजेश विटेकर, गंगाखेडात रासपचे डॉ.रत्नाकर गुट्टे दुसऱ्यांदा तर परभणीत शिवसेना (उबाठा) गटाचे डॉ.राहुल पाटील यांनी हॅट्रीक साधली आहे.
जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार मेघना बोर्डीकर (भाजप) त्यांनी विजय खेचून आणला आहे.त्यांना अंतिम फेरीनंतर १ लाख १२ हजार ३५३ मते मिल्याने त्या प्रथमस्थानी राहिल्या तर माजी आ. विजय भांबळे यांना १ लाख ७ हजार ९५७ मते मिळाल्याने ते द्वितीय स्थानावर आणि वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना ५५ हजार ८३८ मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले.
पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.राजेश विटेकर यांनी चौरंगी लढतीत एकतर्फी विजय खेचून आणला आहे. विटेकर यांना ३० फेऱ्यांअंती निर्णायक ८३ हजार ७६७ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांना ७० हजार ५२३ मते मिळाली .त्यांचा १३ हजार २१९ मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत रासपाचे सईद खान तिसऱ्या क्रमांकावर मजल मारत५४ हजार ६४७,तर अपक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी४८ हजार २५७ मतं मिळवत चौथ्या स्थानावर राहीले.तर अपक्ष माधवराव फड पाचव्या स्थानी १० हजार ५४४ मतं मिळवली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम ,महायुती पूरस्कृत रासपचे उमेदवार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीचे मा.आ.सितारामजी घनदाट यांच्यात तीरंगी लढत झाली.डॉ रत्नाकर गुट्टे यांनी १ लाख ४१ हजार ५४४ मते घेऊन २६ हजार २९२ मतांनी विजयी खेचून आणला.मविआचे विशाल कदम यांना १ लाख १५ हजार २५२ मतं मिळाली.तर वंचितचे सितारामजी घनदाट यांनी ४३ हजार २६ मतं मिळवली उर्वरित ९ उमेदवारांना नाममात्र मते मिळाली.
परभणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील यांनी ३४ हजार २१४ मतांनी विजय मिळवत विजयाची हॅट्रीक साधली आहे.त्यांची प्रतिस्पर्धी महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या आनंद भरोसे यांच्याशी भेट लढत झाली.भरोसे यांना ९२ हजार ५७७ मते पडली. तर विजयी उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील १ लाख २६ हजार ७९१ मते पडली. आ.डॉ. पाटील यांनी १ लाख २६ हजार ७९१ मते पडली. आ.डॉ. पाटील यांनी परभणी विधानसभेतून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला अभेद राखला आहे.