परभणीच्या गंगाखेडात स्था.गु.शाखेने पकडला ४ लाख ७२ हजारांचा गुटखा

Spread the love

पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकाची कारवाई;गुटख्यासह स्विफ्ट कारही जप्त;दोघांवर गुन्हा

परभणी(गंगाखेड) प्रतिनिधी


परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या दबंग पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकाने गंगाखेड शहरात सोमवारी २५ रोजी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत अंदाजे ४ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीच्या गुटख्यासह व एक कार असा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे दबंग पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मिळाली.त्यांनी तातडीने कारवाई करण्यासाठी सपोनि पांडुरंग भारती, जमादार लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, पो. शि. परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, चालक हनवते आदींच्या पथकास रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री पासुनच गुटखामाफीयांच्या पाळतीवर ठेवले.मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील जगदंबा ट्रेडर्सच्या मागे असलेल्या पत्राच्या गाळ्यात एका स्विफ्ट कार मधुन गुटखा आल्याची खात्री लायक माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.यावेळी पथकास सुमारे ४,७२,५०० रुपये किंमतीच्या केसर युक्त गोवा १००० गुटख्याच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एकूण २७ पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये एकूण ७० पाऊच असे एकूण १८९० पाऊच व गुटखा वाहतूकीसाठी वापरल्या जाणारी अंदाजे तीन लाख रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची कार क्रमांक एमएच ४८ एफ १८९० असा एकूण ७,७२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police Station)कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) भा.न्या.सं. सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल करून एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे

You cannot copy content of this page