पुर्णेत संविधान दिन उत्साहात साजरा
पुर्णा (प्रतिनिधी)
येथील भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून संविधान पत्रीकेचे वाचन करून संविधान दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्णा शहरात मंगळवार दि.२६ रोजी संविधान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सोहळ्या निमित्ताने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी समाज बांधवांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन डॉ बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी सामुहिक वंदना पार पडली.कार्यक्रमास संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित माजी नगरसेवक अशोकराव धबाले भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक श्रीकांत हिवाळे यांनी तर सूत्रसंचालन त्र्यंबक कांबळे यांनी केले यावेळी प्रकाशदादा कांबळे, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित यांनी भारतीय संविधाना वर यथोचित प्रकाश टाकला.प्रसंगी मंजुषा ताई पाटील यांनी संविधाना प्रस्ताविकेचे वाचन केले.सुत्रसंचलन बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे,अतुल गवळी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास महिला मंडळाचे पदाधिकारी संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.