विवाहीतेचा छळ;दोन लाखांसाठी मुलींसह घरातून हाकलले..

Spread the love

पूर्णा पोलिसांत पतीसह सासरच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा
पूर्णा(प्रतिनिधी)
तुला दोन्ही मुलीचं झाल्या त्यांच्या लग्नाला पुढे पैसा लागतो तु तुझ्या माहेराहून किराणा दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये यासाठी एक २६ वर्षीय सासुरवाशीणीला पतीसह सासरच्या मंडळींनी मारहाण करून तीच्या दोन्ही मुलींसह घरातून हाकलून दिल्या प्रकरणी पूर्णा पोलिसांत पिडीत महीलेच्या फिर्यादीवरुन दि.२६ नोव्हेंबर मंगळवारी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की पूर्णा येथिल सिद्धार्थनगर येथिल माहेरवाशिणी सोनाली अमोल पुंडगे (वय २६) वर्षे,हिचा विवाह अदिलाबाद जिल्ह्यातील सुंदरया नगर येथील अमोल रतन पुंडगे यांचे सोबत ७ वर्षांपूर्वी झाला होता.सुखी संसाराची काही दिवस संपल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या.दरम्यान एकापाठोपाठ एक मुली झाल्या पहील्या मुलीच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून सोनाली हीचा छळ होत होता.याबाबत तीने आपल्या आईवडिलांना कल्पना दिली होती. नातेवाईकांनी सासरच्यांची समजुत काढून सोनालीचा संसार सुरू करुन दिला.दरम्यान तीस पुन्हा एक मुलगी जन्माला आली.यानंतर मात्र सासरकडील मंडळींनी पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात केली.त्यांनी सोनालीला तुला मुली झाल्या आहेत त्यांच्या लग्नासाठी पैसा जमवण्यासाठी किराणा दुकान टाकण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून तीला शारीरिक व मानसिक त्रास देत दोन्ही मुलींसह घरातून हाकलून दिले.यानंतर पिडीत विवाहिता सोनालीने जिल्हा पो.अ.कार्यालातील भरोसा सेल कडे दाद मागितली मात्र सासरची मंडळी तीला नांदविण्यास तयार नसल्याने तीने दि.२६ नोव्हेंबर मंगळवारी पूर्णा पोलिस ठाणे गाठून पती अमोल पुंडगे,यासह सासु व सासरच्या ११ मंडळीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तपास रमेश मुजमुले करत आहेत.

You cannot copy content of this page