जागतिक महिला दिनी महिलांसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण सत्र संपन्न

Spread the love

जागतिक महिला दिनी महिलांसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण सत्र संपन्न

पुर्णा, दि.८ मार्च,

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र संपन्न झाले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण सत्राचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडेश्वर (ता.पुर्णा) येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, सरपंच राणी पिसाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परभणी जिल्हा अध्यक्ष रितेश काळे, डॉ. कोमल काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त लसीकरणासाठी उपस्थित ज्येष्ठ महिला नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले व मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षांवरील महिला तसेच दुर्धर आजार असणाऱ्या ४५ ते ५९ वयोगटांतील महिलांना लसीकरण करण्यात आले. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.काळे यांनी कोरोना विरुद्ध ची ही लस भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेली असून कोरोना विरुद्ध प्रभावशाली आहे व अत्यंत सुरक्षित आहे तेव्हा कोणीही मनात शंका न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांनी व्यक्त केले.
लसीकरण सत्र यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील डॉ. शिल्पा धुमाळ, डॉ. रेश्मा मुनेश्वर, डॉ.गणेश मसारे, आरोग्य सहाय्यक सिंनगारे, आरोग्य सेविका मीनाक्षी रामसने, वर्षा डोमले, अश्विनी नाईक, वाघमारे, आम्ले, आरोग्य सेवक आर.टी.निलपत्रे, पी.एस. टेकाळे रामप्रसाद काळे, गटप्रवर्तक ज्योती ढगे, सुनीता सुके,कर्मचारी गव्हाणे मामा शेख हुसेन आदीसह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी पुढाकार घेतला.

You cannot copy content of this page