दोघींच्या पिशवीला ब्लेड मारुन ३० हजारांची रोकड पळवली

Spread the love

पूर्णा शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; बँकतील रोकड काढून नेताना घडली घटना.

पूर्णा(प्रतिनिधी)

बँक खात्यातून रक्कम काढून घेऊन जात असलेल्या दोन महीलांच्या पिशीवीला पाळतीवर असलेल्या पाॅकीटमारांनी पिशवीला ब्लेड मारुन दोघींच्या पिशवीतील अनुक्रमे २० व १० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवार दि.२ डिसेंबर रोजी पूर्णा शहरातील बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडली आहे.आठवडी बाजाराच्या दिवशीच अश्या घटना सतत घडत असल्याने शहरात पोलीसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.स्थानिक पोलीस अधिक-यांनी वारंवार घडणा-या घटना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील जनतेतून होत आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत सोमवारी तालुक्यातील सुकी येथिल शोभा राजु रणवीर वय ३४ वर्षे या शेतकरी महीला नर्सिंग कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत तीच्या बँक खात्यात जमा झालेली शिष्यवृत्ती उचलण्यासाठी आल्या होत्या.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीने बँकेतून २० हजार रुपयांची रोकड काढली व ती आपल्या आईजवळ असलेल्या पिशवीत ठेवण्यासाठी दिली.पिशवीत पैसे ठेवून त्या दोघी पोस्ट आॅफीसकडे गेल्या पोस्टात गेल्यावर त्यांनी पिशवीत हात घातला असता त्यांना पिशवीत पैसे आढळून न आल्याने बँकेत अथवा रस्त्यावर पैसे पडले असतील या आशेने त्या तातडीने आल्या पावली परत जाऊन बँकेत पहाणी केली .दरम्यान त्यांना शहरातील सिद्धार्थ नगर येथिल एक गृहीणी गयाबाई लक्ष्मण राजभोज ह्या भेटल्या त्यांच्या देखील पिशवीला ब्लेड मारुन कोणीतरी अज्ञाताने पिशवी फाडून त्यातील १० हजारांची रोकड पळवली असल्याचे त्यांनी रणवीर यांना सांगितले. असता त्यांनी पिशवीला निरखून पाहिले त्यावेळी त्यांच्या देखील पिशवीला ब्लेड मारल्याचे निदर्शनास आले.त्यांना आपले पाॅकीट मारल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पुर्णा पोलिस ठाणे गाठून घटलेली घटना पोलिसांना कळवली.पोलीस ठाण्यात शोभा रणवीर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट..
मागील काही दिवसांपासून स्थानिक पोलिसांकडून भोरट्या चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. चोरटे बॅक ग्राहकांकडील बँकेतून काढलेली रक्कम लुबाडणे, बाजारपेठेत मोबाईल,पाॅकेट चोरीसह दुचाक्या लांबण्याचे प्रकार चोरटे सतत करत आहेत.त्यामुळे पोलिसांनी वेळीच भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

You cannot copy content of this page