अशोक नागठाणेंना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक’ पुरस्कार जाहीर..
पूर्णा/ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार कावलगाव येथील जय जवान जय किसान विद्यालयाचे उपक्रमशील कलाध्यापक अशोक उर्फ सोमनाथ नागठाणे यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघाच्या विद्यमाने महाराष्ट्रातील कलाशिक्षकांची ४३ वी कलाशिक्षण परिषद (अधिवेशन) ११ जानेवारी ला नंदुरबार येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनात “राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार” सोमनाथ नागठाणे यांना प्रदान करण्यात येणार आहे . पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे सुधाकर आंदोले, माधव घायाळ, जगदीश जोगदंड, चंद्रकांत गरुड, दिलीप सोनकवडे, गोविंद शिंदे, केशव लगड, अतुल सामाले, नारायण दूडके, कल्पना खटिंग, पंचशीला लहाने, नारायण गौरकर, मनोहर उगले, राजू सेवेकर, उद्धव पांचाळ, नम्रता पारवे, अश्विनी भोसले, मनोज पिसाळ, सुवर्णा भायेकर, रामदास खरसडे कांतराज कनकापुरे, प्रवीण देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.