कौतुकास्पद;वसुमती राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत माही क-हाळे, अनुराधा स्वामी,पुनम बोबडेचे यश..

Spread the love

परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनीची बाजी;आ.राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने वसुमती राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन..

पूर्णा(प्रतिनिधी)
State level Marathon:हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे संपन्न झालेल्या वसुमती राज्यस्तरीय मॅराथाॅन स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडु माही क-हाळे,अनुराधा स्वामी, पुनम बोबडे यांनी दैदिप्यमान कामगिरी बजावत घवघवीत यश मिळवले आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र विजयी खेळाडूसह मार्गदर्शक सज्जन जैस्वाल, प्रकाश रवंदळे यांचे कौतुक केले जात आहे.
आमदार राजु भैय्या नवघरे(NCP MLA Rajesh Navghare) प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.५ जानेवारी रोजी येथिल मयुर मंगल कार्यालयाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील हजारो खेळाडू सह परभणी जिल्ह्यातील सुमारे १ हजार ५०० खेळाडू सहभागी झाले होते. परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनीही सहभाग नोंदविला होता. माही जगन्नाथ कराळे हिने महिला गटात १८ वा क्रमांक ,तर १७ वर्ष वयोगटातील अनुराधा स्वामी व पुनम बोबडे या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावत विजयश्री खेचून आणली आहे.सर्व खेळाडू सह मार्गदर्शक सज्जन जैस्वाल, प्रकाश रवंदळे यांचे संयोजकांनी रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल असोशिएशनचे अध्यक्ष संतोष एकलारे ,उपाध्यक्ष सतिश टाकळकर ,कैलास टेहरे, उद्धव बोबडे यांच्या सह विद्या प्रसारणी शाळेचे अध्यक्ष डॉ. विनयजी वाघमारे, भीमरावजी कदम,श्रीनिवास काबरा,विजयकुमार रुद्रवार, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, कडुबा काकडे, बी.बी मोरे, डी. एल. रणमाळ , डॉ.हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक डी.एल उमाटे हिंगणे सर ,सर्व शिक्षक वृंद आदीं मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page