भाजपा सदस्य नोंदणी;पूर्णेत नोंदणी साठी घर चलो अभियान
पूर्णा(प्रतिनिधी)
आपल्या भाजपा परिवारामध्ये महाराष्ट्रातील दीड कोटी देशभक्त सदस्यांना सामील करून घेण्यासाठी भाजपाच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे.
पूर्णा शहरात मराठवाडा संघटनमंत्री माननीय संजय भाऊ कोडगे यांच्या नेतृत्वाखाली घर चलो अभियान राबवण्यात आले या अभियानाच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन नागरिकांच्या सदस्य नोंदणी सुरू करण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय भाऊ कोडगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि अभियानाचा आढावा घेतला.यावेळी भाजपा नेते बाळासाहेब कदम, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम कदम,सभापती बालाजी रुद्रावर,जिल्हा संयोजक विजय कराड,तालुकाध्यक्ष नरहरी ढोंणे, शहराध्यक्ष प्रशांत कापसे,डॉ अजय ठाकूर,राम चापके,कपिल कदम,संजय मोहिते,बालाजी कदम,राज ठाकर,राम पुरी,मधुकर मुळे,सुनील डुबेवार, आदी उपस्थित होते.