पूर्णेत गोवंशाची कत्तल;कावलगावांतील खाटकांविरोधात गुन्हा दाखल..
चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; आरोपीस बेड्या
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील कावलगांवात शासनाने बंदी घातलेल्या गोवंशाची कत्तल करून मासाची विक्री करुन गोणीमध्ये मासाचे तुकडे व एक कातडी भरुन नेत असलेल्या एका खाटकाला चुडावा पोलिसांनी जेरबंद केली असल्याची घटना ता.२४ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.पोलीसांनी घटनास्थळांवरुन ५ हजार ५०० रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव येथे मागील काही दिवसांपासून गोवंश गायी,कालवड,बैलांची कत्तल होत असल्याची कुणकुण चुडावा पोलीसांना लागली होती.ता.२४ रोजी कावलगांव येथिल खाटीक गौस यासीन कुरेशी याने शासनाने बंदी घातलेल्या गोवंश हत्या कायद्याची बंदी असल्याचे माहीत असतानाही एका गोवंशाची कत्तल केली असल्याच्या खात्री लायक माहिती आधारे चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंह पोमनाळकर यांनी जमादार प्रभाकर कच्छवे, पोकाॅ.विलास मिटके,पोकाॅ.आनंद तोंडेवाड, चापोशि राठोड यांना सोबत घेऊन कावलगांव येथे शुक्रवारी २४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास छापा घातला.यावेळी पोलीसांना गौस यासीन कुरेशी याने गोवंशाची कत्तल करून मासाची विक्री करण्याच्या उद्देशाने गोमांसाचे तुकडे गोणीमध्ये एका कातडीसह भरुन ठेवलेले आढळून आले.यावेळी पोलीसांनी कावलगांव पशुव ैद्यकीय अधिकारी डॉ.गीरी यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करून खाटीक गौस यासीन कुरेशी यांचे सह ५ हजार ५०० रुपायांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला जेरबंद करत त्याचे विरोधात चुडावा पोलीस ठाण्यात जमादार प्रभाकर निवृती कच्छवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं व कलम१३/२५ कलम ३२५ बी.एन.एस सहकलम ५ (क), ८ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोउपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.