HARC संस्थेचा उपक्रम ४१ अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

पूर्णा ता.२४(प्रतिनिधी)

परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ताडकळस, फुलकळस, खडाळा, कमलापूर, लिमला, दस्तापुर, माखणी, या शाळेतील तब्बल ४१ अनाथ व एकल पाल्याची पालकत्व घेऊन शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले.

समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या एकल पालक व अनाथ मुलांची आबाळ होऊ नये त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी म्हणून दरवर्षी एच. ए.आर.सी संस्था या पाल्यांचे पालकत्व घेत असते. तालुक्यातील निवडक वाचनप्रेमी जिल्हा परिषदेतील शाळांच्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक कीट वाटप करण्यात येते. या शैक्षणिक कीट मध्ये उत्तम दर्जाची स्कूल बॅग, एक डझन वही,एक डझन रजिस्टर,कंपास बॉक्स इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उजळणीची पुस्तके, चित्रकला वही असा एकूण संच आहे .पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक दयानंद स्वामी, प्रमुख अतिथी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक ॲड.राजेंद्र खापरे, समर्थ राजुरे,,सर्वेश माहूरकर ,मारुती डोईफोडे, संतोष रत्नपारखे,राजकुमार भाग्यवंत,नागनाथ नागरगोजे,राहुल काऊतकर इत्यादींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत टाक यांनी केले तर आभार रुकमकांत लेंडाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक महेश लोहोकरे शिक्षिका सावळे मॅडम, चंद्रशेखर रसाळ,ज्योती कान्हडकर, तानाजी कळसाईतकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page