फसवणूक;चालकाने केला ट्रक मालकाचा विश्वासघात
चालवण्यासाठी दिलेल्या ट्रकची लावली परस्पर वाट;पूर्णा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी), चालकांवर विश्वास ठेवून मालकाने त्याला चालवण्यासाठी दिलेला लाखों रुपये किंमतीचा सहा चाकी मिनी ट्रक(TATA Truck)चालकाने परस्पर लंपास करुन ट्रक मालकाची सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक(Fraud) केल्याची घटना उघडकीस आली असून ट्रक मालकाने याप्रकरणी पूर्णा पोलिस(Purna Police) ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुरनं ७/२०२५ कलम ३१८(४),३१६(२) भा.न्या.सं(BSN) कायद्यानुसार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम अशोक पल्लय (वय २३) असं फसवणूक झालेल्या ट्रक मालकाचे नाव आहे.ते शहराच्या आनंद नगर येथील रहिवासी असुन मुर्तीकार आहेत. दरवर्षी गणेशोत्सव दुर्गास्तोव वेळी मुर्ती तयार करुन आपली उपजीविका भागवतात त्यांच्या सुबक मुर्ती या परराज्यात देखील विक्री साठी जात असल्याने तसेच ते स्वतः सुशिक्षित बेरोजगार असल्याने त्यांच्या वडीलांनी कर्ज काढून सन फेब्रुवारी २०२२ मध्ये एम.एच २२/एएन/३५४५ क्रमांकाचा सहा चाकी मिनी ट्रक टाटा लिपीटी १५१२ हा टाटा मोटर्स फायनांस शाखा नांदेड यांच्याकडून १९ लाख ५० हजार रुपये फायनांस कर्ज घेऊन खरेदी केला होता. सदर ट्रक त्यांनी स्वतः काही महीने चालवत फायनांसचा प्रतिमहिना ४६८२० रुपये कर्जाचा हप्ता नियमित भरत राहिला.यानंतर काही कारणास्तव नियमित ट्रक चालवणे व देखभाल व्यवहार करणे होत नसल्यामुळे त्याने पूर्णा येथीलच अजिजनगर मध्ये राहणा-या ओळखीचा चालक मोहम्मद साबेर मोहम्मद सिद्दीक यास चालवण्यासाठी देत नांदेड येथील टाटा फायनांसचे १९ लाख ५० हजार रुपयाचे हप्ते ट्रक चालवून परतफेड करण्याकरीता करारनामा दस्त क्रमांक ५२१,सन २०२३ ता.२३/१२/२०२३ रोजी तयार करुन साक्षीदारासमक्ष ताब्यात दिला व त्यावेळी कराराच्या तारखेनंतरचे फायनांस कर्जाचे संपूर्ण हप्ते भरण्याची हमी मोहम्मद साबेर याने दिली होती.त्यानंतर सदर ट्रक तो चालवत होता असे असताना फायनांसचे हप्ते न भरल्या गेल्यामुळे ट्रक मालक शुभम यास टाटा फायनांस अधिका-याचा फेब्रुवारी २०२४ पासून हप्ता भरला नसल्याचा फोन आला लवकर भरणा न केल्यास ट्रक जप्त करण्याचे सांगितले.त्यामुळे शुभम व त्याचे वडील याने साबेर यास जावून हप्ते भरण्यासाठी व ट्रक ताब्यात देण्यासाठी विचारणा विनंती केली असता त्याने मी पैसेही भरीत नाही आणि ट्रकही देत ट्रक भंगारवर विकला काय करायचे ते करा म्हणून धमकी दिली.त्यानंतर पूर्णा पोलिस ठाण्यात ता.९ जानेवारी रोजी मोहम्मद साबेर मोहम्मद सिद्दीक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रामकृष्ण नांदगावकर हे करत आहेत.