रेल्वेच्या धडकेत ७० वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू
पूर्णा- परभणी लोहमार्गावरील खुजडा शिवारातील घटना पोलिसांत घटनेची नोंद
पूर्णा (प्रतिनिधी)
धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ७० वर्षीय वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा -परभणी लोहमार्गावरील खुजडा शिवारात मंगळवार तारीख ४ फेब्रुवारी घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
लिंबाजी दिगंबर भिसे वय ७० वर्ष रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी असं त्या रेल्वेच्या धडकेत मृत्यू पावलेल्या वयोवृद्ध इसमाचे नाव आहे. लिंबाजीराव भिसे हे मंगळवार ता.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पूर्णा शहरातून खुजडा गांव हाकेच्या अंतरावर असल्याने रेल्वे पटरीच्या बाजूने खुजडा गावाकडे जात असताना पूर्णा शहरापासून जवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुला जवळील परभणीच्या दिशेने खुजडा शिवारातील रेल्वे लोहमार्गावर असलेले खांब क्रमांक ३१७/४,३१७/२ च्या दरम्यान त्यांना कोणत्यातरी धावत्या रेल्वेने पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती खुजडा येथील पोलीस पाटील रमाकांत भालेराव यांनी पोलिसांना दिली पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी तातडीने फौजदार पडलवार जमादार रमेश मुजमुले आदिनाथ घटनास्थळी पाठवले . पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरी तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात नोंद घेण्यात आली असून याप्रकरणी अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते .