पुणे इज्तेमा;नांदेड रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सोडा

Spread the love

काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अहमद यांची मागणी

पूर्णा(प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी

पूर्णा(प्रतिनिधी)
फेब्रुवारी महिन्यात २,ते,४ तारखे दरम्यान राज्यातील मुस्लिम धर्मीयांच्या वतीने पूणे येथे भव्य स्वरुपात तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या इज्तेमाला जाण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी पूर्णा काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा रेल्वे इज्तेमा आयोजन समितीचे सदस्य शेख अहमद यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या कडे केली आहे.
पुणे येथे मुस्लिम धर्मियांकडून २ ते ४ फेब्रुवारी रोजी दरम्यान भव्य दिव्य स्वरुपात इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास राज्यातील मुस्लिम समाज बांधवासह मराठवाड्यातून देखील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे परभणी, हिंगोली,नांदेड,जालना औरंगाबाद, बिड, लातुर, अहमदनगर आदीं जिल्ह्यातून इज्तेमा करीता जाणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या सोयी साठी नांदेड रेल्वे विभागातून तीन दिवसीय इज्तेमा दरम्यान नांदेड-पुणे-नांदेड अशा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात तसेच या विशेष रेल्वेंना तालुका व जिल्हा ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा रेल्वे इज्तेमा आयोजन समितीचे सदस्य शेख अहमद यांनी नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्या कडे केली आहे.

You cannot copy content of this page