पांगरा ढोणे येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.!

Spread the love
पूर्णा ता.५(प्रतिनिधी) तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.     
सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात यामध्ये पहाटे ४ वा. काकड आरती ,६ वा. ज्ञानेश्वरी पारायण, स.१० तुकाराम गाथा भजन, दु.१ वा.भावार्थ रामायण,३वा.ज्ञानेश्वरी प्रवचन, सायं ५वा. हरिपाठ ९ वा. हरिकीर्तन, हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत बुधवार (ता.६) रोजी ह.भ.प.भगवान महाराज शेंद्रेकर तर प्रवचन ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली ठाकूर बुवा यांचे प्रवचन होईल,ह.भ.प.माधव महाराज फुलकळसकर, ह.भ.प. भगवान गुरुजी ढोणे यांचे प्रवचन,ह.भ.प.प्रसाद महाराज गडदे ब्रम्हावाडी, ह.भ.प.संतराम महाराज ढोणे यांचे प्रवचन,ह.भ.प.माधव महाराज काळबांडे श्रीरामपुर, ह.भ.प.दिपक गुरु महाराज पांगरेकर,अँड ह.भ.प.यादव महाराज डाखोरे वाईकर, ह.भ.प.सोपान गुरुजी ढोणे, ह.भ.प. गजानन गुरुजी लहानकर, ह.भ.प.गोपाळ गुरुजी भुसारे नावकीकर,ह.भ.प.बबन महाराज मुडीकर,ह.भ.प. हरी गुरुजी बुचाले आव्हईकर, बुधवार १३रोजी स.९ वा. श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल आणि महादेव मंदिर परिसरात आश्वाचे गोल रिंगण सोहळा होईल, दुपारी २ ह.भ.प. भागवत महाराज ठाकुर यांच पुजेचे किर्तन या नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होईल.राञी ह.भ.प.राम महाराज सुगाव नांदेड यांचे होईल, गुरुवार १४ रोजी स.९ ह.भ.प. नारायण महाराज टाकळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल तरी या किर्तन श्रवनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पांगरा ढोणे यांनी केले आहे ,

You cannot copy content of this page